अहमदनगर- मुदतबाह्य झालेली कीटकनाशके पुन्हा बाजारात विकण्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर आज (गुरुवारी) छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.
अहमदनगरमध्ये लेबल बदलून मुदतबाह्य किटकनाशकांची विक्री; लाखोंचा मुद्देमाल जप्त, कृषी विभागाची कारवाई - बी बियाने
जप्त केलेला मुदतबाह्य कीटकनाशकांचा एकूण मुद्देमाल हा जवळपास एक कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य गुणवत्ता नियंत्रक दीपक पानपाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नीतनवरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर. देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रताप पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामांमध्ये होत होता. याबाबतची माहिती मिळताच कृषी विभागाच्या पथकाने तेथे छापा मारला. त्यावेळी या गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली. तसेच कीटकनाशकावरील वेस्टन बदलून तेथे नव्याने वेस्टन लावण्यात येत असल्याचे दिसून आले. या कारवाईत पथकाने लेबल बदलण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदी साहित्याचा समावेश आहे.