महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2019, 4:38 AM IST

ETV Bharat / state

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

पोटाचं टिचभर कळगं भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काही आदिवासी कुंटूंब श्रीगोंद्या तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आलेली आहेत. या कुटुंबातील अनेक छोटी छोटी बालके शाळाबाह्य होती. ही बाब अग्निपंख या सामाजिक संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुलांना गणवेश, दप्तर देऊन मडकेवाडी येथील शाळेत वाजत गाजत दाखल केले.

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

अहमदनगर - पोटाचं टिचभर कळगं भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काही आदिवासी कुंटूंब श्रीगोंद्या तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आलेली आहेत. या कुटुंबातील अनेक छोटी छोटी बालके शाळाबाह्य होती. ही बाब अग्निपंख या सामाजिक संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या मुलांना गणवेश, दप्तर देऊन मडकेवाडी येथील शाळेत वाजत गाजत दाखल केले. अग्निपंखच्या या अनोख्या उपक्रमातून या आदिवासींच्या झोपड्यात ज्ञानाचा दिपोत्सव सुरू झाला आहे.

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावले 'अग्निपंख फाऊंडेशन'

ऊस तोडणी मजुराप्रमाणे मराठवाडा विदर्भ खान्देशमधून शेकडो भुमीहीन आदिवासी कुंटुब शेतीतील मजुरीची कामे करण्यासाठी परजिल्ह्यात स्थिरावली असतात. भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अग्निपंख फाऊंडेशन काम करत आहे. आदिवासी मुलांच्या आई वडीलांची भेट घेऊन फाऊंडेशनच्या सदस्यांनी मुलांना शाळेत घालण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली.

क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत मुली आणि बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली. पण दुर्दैवाने महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात आजही एक वर्ग असा आहे की जो कष्टकरी, भूमिहीन आणि रोजगाराच्या शोधात भटकंती करत आहे. अशा कुटुंबातील लहानग्यांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्यामुळेच अग्निपंख सारख्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांच्या पंखांना समाजाने बळ देण्याची गरज आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details