अहमदनगर :आज उत्सवाच्या सांगता दिनी (Saibaba Punyatithi Utsav concludes) पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे ०५.४५ वाजता श्रींचे मंगल स्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही (After various religious programs) आरती झाली. सकाळी ०७.०० वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. तर समाधी मंदिरात प्रशासकीय अधिकारी संजय जोरी व त्यांच्या सुविद्य पत्नी किरण जोरी यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली.
कार्यक्रमाची नियमावली :सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. अंजली श्रीकृष्ण जोशी यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, प्राप्तिकर विभाग नाशिक सहआयुक्त संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. रात्री ०७.३० ते ०९.४५ यावेळेत सुप्रसिध्द गायिक गोविंद सखराम देशपांडे यांचा सुगम संगीतचा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.