अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील प्रेमविवाहातून झालेल्या जळीतकांडप्रकरणी मृत मुलगी रुक्मिणी हिच्या फरार आरोपी असलेल्या वडिलांना पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुलीचे चुलते सुरेन्द्र कुमार भरतीया, मामा घनश्याम सरोजा यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आता वडिलांना अटक केल्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
अहमदनगरमधील निघोज 'सैराट' प्रकरणातील फरार झालेला बाप पोलिसांच्या ताब्यात, प्रकरणाचे गूढ मात्र कायम - आरोपी
रुक्मिणी आणि तिच्या पतीला जाळण्यात आले, की पतीनेच रुक्मिणीला जाळून मारले याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याबाबत निघोज परिसरातील अनेक व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत.
दरम्यान, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत माहिती देताना या प्रकरणाला अनेक कंगोरे असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
रुक्मिणी आणि तिच्या पतीला जाळण्यात आले, की पतीनेच रुक्मिणीला जाळून मारले याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याबाबत निघोज परिसरातील अनेक व्यक्तींकडून पोलीस माहिती घेत आहेत. यासंदर्भात अनेकांचे जबाब नोंद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, एकूणच या प्रकरणाचे गूढ अजुनही कायमच आहे.