महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 1, 2021, 12:46 PM IST

ETV Bharat / state

'सभा-समारंभातील अतिउत्साहामुळेच कोरोनाची दुसरी लाट'

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. याला सभा-समारंभ आणि नागरिकांचा अतिउत्साह जबाबदार असल्याचे मत ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

Hassan Mushrif on corona second wave
हसन मुश्रीफ

अहमदनगर - मागील वर्षीही राज्यात कोरोनाचा प्रभाव होता. मात्र, तो ओसल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातील सभा-समारंभ आणि नागरिकांच्या अतिउत्साहमुळे कोरोनाची दुसरी लाट आली, असे मत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळल्यास आपण या लाटेला तोंड देऊ शकू, असेही मुश्रीफ म्हणाले.

सभा-समारंभातील अतिउत्साहामुळेच कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले

आज (१ मे) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने जिल्ह्यातील आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यात आता कडक लॉकडाऊनचे आदेश -

नगरजिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच आहे. नागरिक लॉकडाऊनचे नियम गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यापुढे कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याबद्दल जिल्हाधिकारी स्वतंत्र आदेश काढणार असून त्याची अंमलबजावणी दोन दिवसात सुरू होईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details