शिर्डी ( अहमदनगर ) - एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार व्हाव लागलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. त्यात आता शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटातील बंडखोर आमदारांवार निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांना सगळ काही दिलं आहे. त्यापेक्षाही जास्त दिलं ही आमची चुक होती. त्यांना जास्ती दिलं त्याचं त्यांना अपचण झालं. याला आम्ही कारणीभूत आहे, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं ( aaditya thackeray attacks shivsena rebel mla ) आहे.
आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेद्वारे शिर्डीत आले होते. त्याचा समारोप करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरेंनी साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच, साईंच्या चरणी जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. देवाने आतापर्यंत जे दिलं. त्याचाच विचार मी प्रत्येक मंदिरात गेल्यावर करतो. देवाच्या समोर आल्यावर अन्य काही विचार करत नाही, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
'गद्दारी करुन गेलात तरीही...' -दरम्यान, साई मंदिरात जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. 'तुमच्या कपाळावर आता गद्दार लिहलं गेलं आहे. ते आता पुसल जाणार नाही. गद्दारी करुन गेलात तरीही ज्यांच्यासाठी आपण काम केल मेहनत घेतली सगळ काही केलं, तरी यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचं दु:ख होत आहे. त्याच्याबद्दल राग नाही पन दु:ख आहे,' असं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.