महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा, २ लाखांच्या रोख रकमेसह ८ अटकेत - जुगार अड्ड्यावर छापा

जिल्ह्याच्या राहुरीमधे एका शेतात जुगार खेळणाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत 2 लाख ७३ हजारांच्या रोख रक्कमेसह 8 जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा
राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा

By

Published : Apr 23, 2020, 8:34 AM IST

Updated : Apr 23, 2020, 11:31 AM IST

अहमदनगर - जिल्ह्याच्या राहुरी परिसरातील एका शेतामध्ये काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत 2 लाख ७३ हजारांच्या रोख रक्कमेसह 8 जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

राहुरीत जुगार अड्ड्यावर छापा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही मोकळ-ओहळ येथील शेतीत हे जुगारी जुगार खेळत असल्याची चाहुल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना लागली. संबंधित माहितीच्या आधारे पोलिसांना तत्काळ सापळा रचत या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. याप्रकरणी साथीचे रोग अधिनियमसह आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत 8 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details