महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काटमोरा धरणातून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा, शेतकऱ्यांची मागणी - पाणी साठा

धरणात उपलब्ध असलेल्या मृत पाणीसाठ्यातून गावांना देण्यात येणारे पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १० ते १५ दिवस पुरेल इतका असून अशीच पाणी चोरी सुरू राहिली तर ७ दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात दिवसा पाण्याचे बाष्पीभवन होऊन दिवसागणिक पाणीसाठा कमी होत आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 5, 2019, 5:23 PM IST

Updated : May 5, 2019, 8:29 PM IST

शिर्डी- अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. पाण्यावरून आता कलह निर्माण होण्याची शक्यता संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाल्यात दिसू लागली आहे. तालुक्यातील कोटमारा धरणातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा सुरू आहे. हा अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पाणी चोरांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी


संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या कोटमारा धरणाची क्षमता १५५ दशलक्ष घनफूट आहे. आज घडीला या धरणात केवळ ५ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांच्या पाणी पुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहे. कडक उन्हाळा लक्षात घेता धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा, यादृष्टीने बोटा ग्रामपंचायत स्थरावरून नियोजन करण्यात येत आहे.


सबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती, तहसील कार्यालय तसेच प्रांताधिकारी आणि पाटबंधारे विभागाला वेळोवेळी धरणातून होणारी पाणीचोरी बाबत निवेदन दिले आहे. मात्र, योग्यवेळी कारवाई न केल्याने संभाव्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. येथील काही स्वयं घोषित गावपुढारी धरणाच्या पात्रात सायंकाळी साडेपाचनंतर विद्युत मोटारी सोडून रात्रभर वारेमाप पाणी उपसा करतात. त्यामुळे यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.


धरणात उपलब्ध असलेल्या मृत पाणीसाठ्यातून गावांना देण्यात येणारे पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १० ते १५ दिवस पुरेल इतका असून अशीच पाणी चोरी सुरू राहिली तर ७ दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात दिवसा पाण्याचे बाष्पीभवन होऊन दिवसागणिक पाणीसाठा कमी होत आहे.


धरणात सध्या २ ते ३ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने गांभीर्याने कारवाई करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची मागणी बघता पाटबंधारे विभागाने आता हालचाल करायला सुरुवात केली आहे. धरणातील पाणी चोरी रोखण्यात पाटबंधारे विभागाला अडचणी येत आहेत. मात्र, पाणी चोरी रोखण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. अन्यथा लवकरच बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांना भीषण पाणी टंचाईला समोरा जावे लागणार आहे.

Last Updated : May 5, 2019, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details