अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, अजून ५४ अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोरोनाबाधित २ रुग्णांचे १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी बूथ हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला जाणार आहे. यात आलमगीर येथील एक आणि सर्जेपूरा (नगर) येथील एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
दिलासादायक : आणखी १९ जणांच्या स्त्राव चाचणीचा अहवाल निगेटिव्ह, तर दोनजण कोरोनामुक्त - corona in maharashtra
जिल्ह्यामध्ये रुग्णालयात दाखल असेल्या रुग्णांपैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, दोनजण हे कोरोनामुक्त झाले असून त्या दोघांना आज रुग्णाल्यातून डिस्चार्ज मिळणार आहे.
जिल्ह्यामध्ये रुग्णालयात दाखल असेल्या रुग्णांपैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, दोनजण हे कोरोनामुक्त झाले असून त्या दोघांना आज रुग्णाल्यातून डिस्चार्ज मिळणार आहे. या दोन्ही बाधितांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. इतर निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती या जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १ हजार ४०९ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ हजार ३१० व्यक्तींचा स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ३१ जणांचे हे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. अजून ५४ अहवालाची प्रतीक्षा आहे. तर काही अहवाल प्रयोगशाळेने फेटाळून लावले होते.