महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी विमानसेवा पूर्ववत सुरू, धावपट्टीवरुन घसरले होते विमान

तसेच धावपट्टीच्या खाली उतरलेले विमानही ओढून टर्मिनल बिल्डींगसमोर आणण्यात आले आहे़. यामुळे आज बुधवारपासून विमानसेवा नियमितपणे सुरू करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी दिली आहे.

धावपट्टीवरुन घसरलेले विमान

By

Published : May 2, 2019, 9:58 AM IST

अहमदनगर - विमान धावपट्टीवरून घसरल्याच्या घटनेमुळे ३० एप्रिल रोजी दिवसभर विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. मातीत फसलेले स्पाईस जेटचे विमान आज बाहेर काढण्यात आले आहे. शिर्डीहून निघणाऱ्या विमानांची सेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

विमानतळाची चलचित्रे

२९ एप्रिल रोजी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून आलेले विमान धावपट्टीवरुन खाली घसरल्याची घटना घडली होती. हे विमान धावपट्टीवरून काढण्यासाठी काल दिल्लीहून डायरेक्टर ऑफ इव्हीएशनचे पथक शिर्डी विमानतळावर दाखल झाले़ होते. या पथकाने संपूर्ण धावपट्टी व अपघात झालेल्या विमानाची पहाणी केल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला.


तसेच धावपट्टीच्या खाली उतरलेले विमानही ओढून टर्मिनल बिल्डींगसमोर आणण्यात आले आहे़. यामुळे आज बुधवारपासून विमानसेवा नियमितपणे सुरू करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी दिली आहे.

सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दिल्लीहून येणारे स्पाईस जेटचे विमान धावपट्टी सोडून खाली उतरले होते. यामुळे या विमानात जवळपास तीन तास प्रवासी अडकून पडले होते़. सायंकाळी उशिरा विमानाच्या मागील दरवाजाने या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले़. या विमानात १६४ प्रवासी होते़. या घटनेनंतर केवळ जयपूर व मुंबईसाठी विमान रवाना झाले़. दिल्ली आणि हैद्राबादचे लँडीग व टेकअप थांबवण्यात आले होते.


तसेच, मंगळवारी दिवसभर विमानसेवा बंद ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. वर्षभरातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी मुंबईहून येणारे विमानही असेच धावपट्टीच्या खाली उतरले होते़. यामुळे शिर्डी विमानतळ प्रशासन व डायरेक्टर ऑफ ईव्हीएशनने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिर्डीहून सध्या मुंबई, जयपूर, हैद्राबाद, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळरू, भोपाळ या ठिकाणी विमानसेवा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details