महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी' - अहमदनगर

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा  झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी'

By

Published : Feb 17, 2019, 10:39 AM IST

अहमदनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नेवासा तालुक्यातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा कर्तव्यनिधी दिला जाणार असल्याची घोषणा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केली आहे.

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी'
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानांना वीरमरण आले आहे. संजय राजपूत आणि नितीन राठोड अशी या हुतात्मा जवानांची नावे आहेत. या दोघांच्याही कुटुंबीयांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास त्यांच्या मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याचीही जबाबदारी यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांची इच्छा आहे. दहशवाद्यांनी जवानांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्याचा मी तीव्र निषेध करत यात राजकारण न आणता सर्वांनी हुतात्मा सैनिक कुटुंबांच्या मागे उभे राहण्याचेही आवाहन त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details