मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव झाला. या पराभवाने भारतीय हॉकी संघातील खेळाडू तसेच खेळाडूंचे कुटुंबीय आणि चाहते निराश झाले आहेत. पराभवानंतर भारतीय खेळाडू गुरुजंत सिंग यांच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर झाले.
सामना संपल्यानंतर गुरजंतच्या बहिणीने सांगितलं की, आपण उपांत्य फेरीत पोहोचलो ही अभिमानाची बाब आहे. अमृतसरच्या जंडियालामध्ये गुरजंत राहतो. भारताच्या पराभवानंतर गुरजंतची बहिण आणि तिच्या आईला रडू आवरलं नाही.
दरम्यान, यावेळी गुरजंतच्या कुटुंबीयांनी, हार-जीत होत राहते. पण पेनाल्टी कॉर्नरने सामन्याचे रुप पालटल्याचे सांगितलं.
मोदींनी केली कर्णधार मनप्रीत सिंहची फोनवरून बातचित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपांत्य सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवरुन बातचित केली. यात त्यांनी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केलं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.