लंडन - जागतिक महिला क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विम्बल्डनमध्ये तब्बल नऊ वर्षांचा दुष्काळ संपवला. बार्टीने विम्बल्डन २०२१ ची उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. तर क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेलारुसची अरिना सबालेंका हिने संघर्षपूर्ण विजय मिळवला.
विम्बल्डन २०२१ मध्ये प्री उपांत्यपूर्व फेरीत अश्ले बार्टीचा सामना चौदाव्या मानांकित बाबरेरा क्रेजिकोव्हा हिच्याशी झाला. बार्टीने या सामन्यात बाबरेरा हिचा ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बाबरेरा हिने पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. परंतु, बार्टीने अनुभवाच्या जोरावर पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये बार्टीने बाबरेरा हिला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तिने हा सेट ६-३ ने जिंकला.
दुसऱ्या मानांकित अरिना सबालेंका संघर्षपूर्व सामन्यात विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने आठराव्या मानांकित कझाकिस्तानची एलेना रायबाकिना हिने तीन सेटमध्ये ६-३, ४-६, ६-३ असा पराभव केला.