टोकियो - जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोकोव्हिच या व्हिडिओ रागाच्या भरात आपलं टेनिस रॅकेट तोडताना पाहायला मिळत आहे.
नेमक काय आहे प्रकरण जाणून घ्या...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नोवाक जोकव्हिच सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवकडून जोकोव्हिचचा 6-1, 3-6, 1-6 असा पराभव झाला. या पराभवानंतर जोकोव्हिचचे सुवर्णपदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. यानंतर कांस्य पदकासाठीच्या सामन्यात देखील जोकोव्हिचचा पराभव झाला.
जोकोव्हिचने रागाच्या भरात तोडली रॅकेट
कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात जोकोव्हिचला स्पेनच्या पाब्लो बुस्टाने 6-4, 6-7 (6/8), 6-3 अशी धूळ चारली. बुस्टाकडून पराभूत झाल्यानंतर जोकोव्हिच कमालीचा निराश झाला. त्याने भावनेच्या भरात आपले रॅकेट टेनिस कोर्टवर संपूर्ण ताकतीनिशी मारले. यात ते रॅकेट तुटले.
जोकोव्हिचच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची ही कृती चाहत्यांच्या पचनी पडली नाही. चाहते त्याला या विषयावरुन ट्रोल करत आहेत. दरम्यान, एका कृत्यामुळे जोकोव्हिचने चाहत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे.
हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत
हेही वाचा -Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली इम्मा मॅकेन