न्यूयॉर्क -जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच याला यूएस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव याने चांगलेच झुंजवले. दोघातील सामना पाच सेटपर्यंत रंगला. यात जोकोविचने 4-6, 6-2, 6-4, 4-6, 6-2 अशा फरकाने बाजी मारली.
नोवाक जोकोविच एका खास विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. तो जर ही स्पर्धा जिंकला तर एकाच वर्षात चार मोठ्या स्पर्धा जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. याआधी 1969 मध्ये रोड लेवेर यांनी अशा कारनामा केला होता. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील जोकोविचचा हा सलग 27वा विजय आहे.
यूएस ओपनचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि दुसऱ्या मानांकित डेनिल मेदवेदेव याच्यात होणार आहे. जोकोविचने मेदवेदेवचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली तर त्याचे हे विक्रमी 21वे ग्रँडस्लॅम ठरेल.