लंडन - अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही. तिने ऑलिम्पिकमधून का सहभागी होणार नाही. याचे स्पष्ट कारण सांगितलं नाही.
सेरेना म्हणाली, ऑलिम्पिकमधून माघार घेण्यास अनेक कारणे आहे. मी तिथे जाऊ इच्छित नाही. मी याबद्दल माफी मागते. पुढे ती म्हणाली, मी खरोखर ऑलिम्पिकच्या यादीत नाही. मला त्याबद्दल माहिती नाही. जर हे खरे असेल तर मला तिथे जायला नको.
दरम्यान, सेरेना २३ ग्रँडस्लॅम विजेती दिग्गज टेनिसपटू आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्णपदके पटकावली आहेत. २००० सिडनी आणि २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने एकेरीत व दुहेरी प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. पण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच सेरेनासह राफेल नदाल, ऑस्ट्रेयाचा टेनिसपटू डोमिनिक थीम आणि कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापोवालोव यांनी माघार घेतली आहे.