न्यूयॉर्क -जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने यंदाच्या यूएस ओपनमध्ये खेळण्यासाठी पसंती दर्शवली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर दुसर्या दिवशी जोकोविचने आपले मत दिले. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल.
जोकोविच म्हणाला, ''यूएस ओपन ही जगातील सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. मला नेहमीच या स्पर्धेत खेळायला आवडते. यंदा स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहण्याची शक्यता नाही. ही आश्चर्यकारक बाब आहे. निर्णय घेण्यास अजून बराच वेळ बाकी आहे."