मुंबई- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने, कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी १.२५ करोड रुपयाची रक्कम जमवली आहे. सानिया ही रक्कम गरजूंना देणार आहे. संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात गरजूंना मदत लागेल, त्यांच्यासाठी ही रक्कम कामी येईल. किमान १ लाख लोकांना या रकमेमुळे सहायता मिळेल, असे सानियाने म्हटलं आहे.
सानियाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ती म्हणते की, 'गरजूंना सहायता करण्यासाठी, आम्ही मागील आठवड्याभरात एक टीमच्या माध्यमातून प्रयत्न केला. यात आम्ही हजारो लोकांना जेवण दिलं. याबरोबर आम्ही १.२५ करोड इतकी रक्कम जमवली. जी किमान एक लाख लोकांसाठी उपयोगी ठरेल. हा एक छोटासा प्रयत्न होता. आपल्याला एकजूट होऊन अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत.'
सानियाच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. एका चाहत्याने तिला, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तु आपले प्रयत्न सुरू ठेव, असे म्हटलं आहे. तर सानियाचे सासर पाकिस्तानमधूनही तिचे कौतूक होत आहे.