आई झाल्यानंतर खूप दिवसांनी सानिया उतरली टेनिस कोर्टवर
सानिया मिर्झाने टेनिस खेळतानाचा व्हिडिओ केला शेअर
Sania Mirza
हैदराबाद - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आई झाल्यानंतर खूप दिवसांनी टेनिस कोर्टवर पाहायला मिळाली. सानिया कोर्टवर उतरुन टेनिसचा सराव करताना पाहायला मिळाली. टेनिस खेळतानाचा आपला व्हिडिओ सायनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
सानिया आणि पाकचा क्रिकेपटू शोएब मलिक २०१० मध्ये विवाहबद्ध झाले होते. सानिया गर्भवती झाल्यानंतर टेनिसापासून लांब होती. बाळाच्या जन्मानंतर आता सानिया मिर्झा ऑगस्टमध्ये होणाऱ्या अमेरिकन ओपन स्पर्धेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सायनाने आपला मुलागा इजहान सोबतचाहीएक फोटो काल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माय-लेकाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.