लंडन - टेनिसचा महानायक समजल्या जाणाऱ्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या राफेल नदालला हरवून विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली. फेडररचा सामना रविवारी गतविजेत्या नोव्हाक जोकोविचसोबत होणार असून चाहत्यांना या महामुकाबल्याचा आनंद घेता येणार आहे.
विम्बल्डन स्पर्धा : महाअंतिम सामन्यासाठी फेडरर - जोकोविच आमने सामने
सेंटर कोर्टवर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात फेडररने नदालचा ७-६, १-६, ६-३, ६-४ असा पराभव करत आपणच ग्रास कोर्टचा राजा असल्याचे सिद्ध केले.
सेंटर कोर्टवर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात फेडररने नदालचा ७-६, १-६, ६-३, ६-४ असा पराभव करत आपणच ग्रास कोर्टचा राजा असल्याचे सिद्ध केले. फेडररकडून नदाल तब्बल १६ वेळा पराभूत झाला आहे. फेडररने बारावेळा तर जोकोविचवने सहा वेळा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
जोकोविचने ही स्पर्धा जिंकली तर त्याच्यासाठी हे पाचवे तर फेडररसाठी नववे विजेतेपद असणार आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच याने उपांत्य फेरीत रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.