स्पेन (माद्रीद) - जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने माद्रीद ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. नदालने दुसऱ्या फेरीत कॅनडाचा युवा खेळाडू फेलिक्स एयूगरवर 6-3, 6-3 अशी सरळ सेटमध्ये मात केली. नदालने आपल्या कारकिर्दीत माद्रीद ओपन ही स्पर्धा 5 वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
राफेल नदालचा माद्रीद ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश - madrid open 2019
राफेल नदालने आतापर्यंत माद्रीद ओपन स्पर्धा 5 वेळा जिंकली आहे
राफेल नदाल
खेळल्या गेलेल्या दुसऱ्या फेरीत नदालने आपल्या अनुभवाच्या जोरावर पूर्ण सामन्यात वर्चस्व राखत फेलिक्सला आघाडी घेण्याची संधीच दिली नाही. माद्रीद ओपनच्या विक्रमी सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नदालचा सामना तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएशी होणार आहे.