महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO: नोव्हान जोकोव्हीच २५० किलो सुमो पैलवानशी पंगा घेतो, तेव्हा.. - Novak Djokovic Fighting a Sumo

नोव्हानने आज (सोमवार) सकाळी टोकियोत सुमो पैलवानाशीच पंगा घेतला. त्याने रिंगमध्ये उतरत सुमो पैलवानासोबत दोन हात केले आणि सुमो 'ट्रिक्स' शिकून घेतल्या. या लढतीचे तीन व्हिडिओ 'एटीपी टूर'ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Video Novak Djokovic Tried Fighting a Sumo Wrestler and the Results Were Hilarious

By

Published : Sep 30, 2019, 6:03 PM IST

Updated : Sep 30, 2019, 7:11 PM IST

टोकियो- सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर, टेनिस जगतातील रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि अँडी मरे यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंना धूळ चारली आहे. आता मात्र, नोव्हाक जोकोव्हिच वेगळ्या खेळासंदर्भात चर्चेत आला आहे.

नोव्हानने आज (सोमवार) सकाळी टोकियोत सुमो पैलवानाशीच पंगा घेतला. त्याने रिंगमध्ये उतरत सुमो पैलवानासोबत दोन हात केले आणि सुमो 'ट्रिक्स' शिकून घेतल्या. या लढतीचे तीन व्हिडिओ 'एटीपी टूर'ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

नेमकं काय आहे व्हिडिओत -
एटीपी टूरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोव्हान जोकोव्हिच एका अगडबंब सुमो पैलवानाशी पंगा घेताना दिसत आहे. यात तो सुमो पैलवानाला रिंगच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यात तो असफल ठरलेला दिसत आहे.

नोव्हाक जोकोव्हिच सुमो पैलवानसोबत...

दरम्यान, या लढतीनंतर नोव्हानने सांगितले की, 'मी खूपच दुबळा आहे. मला आणखी वजन वाढवायला हवे, यानंतरच मी सुमोशी लढण्यासाठी सक्षम होऊ शकेन. मात्र, माझ्यासाठी ही लढत आनंददायी ठरली.'

नोव्हाक जोकोव्हिच सुमो 'ट्रिक्स' शिकून घेताना...

सुमो पैलवान हे वजनामुळे जगभरात प्रसिध्द असतात. या पैलवानांचे वजन जवळपास २५० किलोहून अधिक असतं. नोव्हानने, मी वडिलांसोबत प्रसिध्द सुमो पैलवान योकोजुना यांची फाईट पाहिले असल्याचे सांगितले.

हेही वाचा -युवीच्या 'चिकना चमेला' लूकवर सानिया मिर्झाचे मजेशीर कमेंट

हेही वाचा -'माझे शरीर आता थकले आहे', टेनिस स्टार मरेने दिली प्रतिक्रिया

Last Updated : Sep 30, 2019, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details