लंडन - सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने दिग्गज रॉजर फेडररच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्याने फेडररच्या एटीपी क्रमवारीत ३१० आठवड्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गेल्या महिन्यात जोकोविचने आपले नववे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले. जोकोविचने आपल्या कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे. तो आता फेडरर आणि नदालच्या वैयक्तिक २० ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे.
जोकोविच म्हणाला, "प्रथम क्रमांकावर राहण्याची ऐतिहासिक कामगिरी करून मला मोठा दिलासा मिळाला आहे. आता माझे लक्ष सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्यावर आहे.''