लंडन -सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच याने उपांत्य फेरीत रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे जोकोव्हिचला आता पाच वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याची संधी लाभणार आहे.
विम्बल्डन स्पर्धा : जोकोव्हिचची अंतिम फेरीत धडक, उपांत्य सामन्यात रॉबेर्टोवर मात - roberto
जोकोव्हिचला आता पाच वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याची संधी लाभणार आहे.
२३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टाने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. मात्र विजयाचे सातत्य पुढील दोन सेटमध्ये राखता न आल्यामुळे ब्युटिस्टाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
विम्बल्डनमध्ये आता राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. त्यामुळे जोकोव्हिचला अंतिम सामन्यात दमदार लढत द्यावी लागणार आहे. राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे दोन्ही खेळाडू २००८ साली विम्बल्डनमध्ये समोरासमोर आले होते. तसेच हे दोघे याच वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये भिडले होते. या सामन्यात स्पेनच्या नदालने बाजी मारली होती.