महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची कोरोनावर मात - जोकोविचची कोरोनावर मात न्यूज

सर्बिया आणि क्रोएशिया येथे आयोजित केलेल्या अ‌ॅड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेदरम्यान जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना 10 क्वारंटाईन करण्यात आले. मात्र गुरुवारी दोघांचाही कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

novak djokovic and his wife Jelena have both tested negative for coronavirus
दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची कोरोनावर मात

By

Published : Jul 3, 2020, 11:49 AM IST

नवी दिल्ली -जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू आणि सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना कोरोनामुक्त झाले आहेत. 24 जून रोजी जोकोविच आणि जेलेना यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. तर, त्यांच्या मुलांची चाचणी निगेटिव्ह आली होती.

सर्बिया आणि क्रोएशिया येथे आयोजित केलेल्या अ‌ॅड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेदरम्यान जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आले. मात्र गुरुवारी दोघांचाही कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अ‍ॅड्रिया टूरमध्ये भाग घेतल्यानंतर कोरोनोव्हायरसची लागण झालेल्या टेनिसपटूंमध्ये जोकोविच हा पॅाझिटिव्ह असणारा चौथा खेळाडू होता. डेनवर नगेट्सकडून खेळणारा एनबीए खेळाडू निकोल जोकिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. जोकिकने जोकोविचसोबत वेळ घालवला होता. तर, माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेव्हिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते. या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली होती. ग्रिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी यांनाही या स्पर्धेदरम्यान कोरोनाची बाधा झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details