इंडियन वेल्स मास्टर्सच्या उपांत्य फेरीत राओनिकसमोर डोमिनिकचे आव्हान - Wells Masters
सर्बियाच्या केसमाओविचला नमवत राओनिकने उपांत्य फेरीत
इंडियन वेल्स (अमेरिका) - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीम आणि कॅनडाच्या मिलोस राओनिक यांच्यात इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना राफेल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यात होईल.
उपांत्यपूर्व फेरीत गायेल मॉनफिस सामना खेळू न शकल्याने डोमिनिक थीमने सरळ उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. तर मिलोस राओनिकने सर्बियाच्या केसमाओविच ६-३, ६-४ ने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे.
राओनिक आणि डोमिनिक यांच्यातील जो खेळाडू विजयी होईल, त्याला नादाल किवा फेडररच्या कठीण आव्हानाचा सामना अंतिम फेरीत करावा लागणार आहे.