महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मेदवेदेवला कोरोनाची लागण, मोंटे कार्लो मास्टर्समधून घेतली माघार - मेदवेदेव मोंटे कार्लो मास्टर्समधून बाहेर

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रशियाचा स्टार खेळाडू डेनिल मेदवेदेव याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मेदवेदेव मोंटे कार्लो मास्टर्समधून बाहेर पडला आहे.

medvedev-out-of-monte-carlo-masters-with-covid-19
मेदवेदेवला कोरोनाची लागण, मोंटे कार्लो मास्टर्समधून घेतली माघार

By

Published : Apr 14, 2021, 2:19 PM IST

मोनाको - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रशियाचा स्टार खेळाडू डेनिल मेदवेदेव याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मेदवेदेव मोंटे कार्लो मास्टर्समधून बाहेर पडला आहे.

एटीपीने याबाबत सांगितलं की, डेनिल मेदवेदेवची १२ एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे डेनिल मेदवेदेवने मोंटे कार्लो मास्टर्समधून माघार घेतली आहे.

डेनिल मेदवेदेव आयसोलेशनमध्ये आहे. त्याच्या प्रकृतीवर स्पर्धेतील फिजीशियन आणि एटीपीची मेडिकल टीम लक्ष ठेऊन असल्याची माहिती देखील एटीपीने दिली.

डेनिल मेदवेदेवने सांगितलं की, मोंटे कार्लो स्पर्धेतून माघार घेणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय आहे. पण आता माझे संपूर्ण लक्ष प्रकृतीवर असून लवकरात लवकर मी यातून बाहेर पडत मी वापसी करू इच्छित आहे.

हेही वाचा -मेलबर्न पार्कचा राजा - नोवाक जोकोव्हिच

हेही वाचा -टेनिस प्रीमियर लीगमध्ये यूकी भांबरी करणार दिल्लीचे नेतृत्व

ABOUT THE AUTHOR

...view details