महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डेव्हिस चषकापूर्वी भारताला मोठा झटका, बोपण्णा बाहेर - रोहन बोपण्णा लेटेस्ट न्यूज

प्रशिक्षक जीशान अली यांनी एका मीडियासंस्थेला बोपण्णाच्या दुखापतीचे वृत्त दिले. 'माघार घेण्यामागील कारण म्हणून बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीचे कारण सांगितले आहे. सोमवारी त्याच्या खांद्याचे एमआरआय स्कॅन आहे, जे त्याने आमच्याशी शेअर केले', असे अली यांनी म्हटले आहे.

डेव्हिस चषकापूर्वी भारताला मोठा झटका, बोपण्णा बाहेर

By

Published : Nov 19, 2019, 7:29 AM IST

कोलकाता -भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्ध डेव्हिस चषक सामन्यासाठी भारतीय संघातून आपले नाव मागे घेतले आहे. बोपण्णाला संघातून वगळल्यानंतर जीवन नेडुंचेझियानला संघात स्थान मिळू शकेल. आठ सदस्यीय संघात डावखुरा नेडूंचिझियानला तीन राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा -ऐतिहासिक डे-नाईट सामना : हाऊसफुल्ल..हाऊसफुल्ल...हाऊसफुल्ल....!

प्रशिक्षक जीशान अली यांनी एका मीडियासंस्थेला बोपण्णाच्या दुखापतीचे वृत्त दिले. 'माघार घेण्यामागील कारण म्हणून बोपण्णाने खांद्याच्या दुखापतीचे कारण सांगितले आहे. सोमवारी त्याच्या खांद्याचे एमआरआय स्कॅन आहे, जे त्याने आमच्याशी शेअर केले', असे अली यांनी म्हटले आहे.

२९ आणि ३० नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांसाठी ३९ वर्षीय बोपण्णा अनुभवी लियंडर पेसबरोबर दुहेरीत सामील होणे अपेक्षित होते. बोपण्णा हा देशातील अव्वल दुहेरीपटू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details