नवी दिल्ली -टेनिस दिग्गज रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांचे माजी प्रशिक्षक पॉल एनाकोने यांनी यांनी नोव्हाक जोकोविचवर अॅड्रिया टेनिस टूर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल टीका केली आहे. मात्र ही टीका करताना जोकोविचचा हेतू वाईट नसल्याचेही एनाकोने यांनी सांगितले.
एनाकोने म्हणाले, "मला वाटते की या घटनेशी संबंधित लोक आता पश्चाताप करत असतील. जोकोविचला चांगले काम करण्याची हौस होती. ते चांगल्या कारणासाठी होते, परंतु निकाल निराशाजनक होता.''
ही स्पर्धा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आयोजित केली होती. बेलग्रेडमधील स्टेडियमच्या आत ४ हजार प्रेक्षक उपस्थित होते आणि खेळाडू सामन्यानंतर बिनदिक्कतपणे नाईट क्लबमध्ये पार्टी करत होते.
जोकोविचलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दौर्याचा पहिला टप्पा बेलग्रेडमध्ये झाला. तर, पुढचा टप्पा क्रोएशियाच्या जादर येथे होणार होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविच आणि आंद्रे रुबलेव एकमेकांसमोर उभे ठाकणार होते.
बल्गेरियाचा टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव्ह, क्रोएशियाचा बार्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या खेळाडूंनीही अॅड्रिया टूर प्रदर्शन टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. व्हिक्टर ट्रॉकीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.