महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद - एटीपी फायनल्स लेटेस्ट न्यूज

दोन्ही खेळाडूंमधील हा जोरदार सामना १०० मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू होता. थीमचा गटातील सामन्यांमधील हा पहिला विजय होता. तो सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेत भाग घेत आहे. पुढच्या फेरीत थीमचा सामना सर्बियाच्या नोवाक जोकोविचशी होईल.

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर पहिल्याच फेरीत गारद

By

Published : Nov 11, 2019, 4:25 PM IST

लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला सध्या सुरू असलेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत पराभावाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने सरळ सेटमध्ये ७-५, ७-५ असा पराभव केला.

डोमिनिक थीम

हेही वाचा -IND VS BAN : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहरचा 'विश्वविक्रम'

दोन्ही खेळाडूंमधील हा जोरदार सामना १०० मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू होता. थीमचा गटातील सामन्यांमधील हा पहिला विजय आहे. थीम सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेत भाग घेत आहे. पुढच्या फेरीत थीमचा सामना सर्बियाच्या नोवाक जोकोविचशी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details