महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियन ओपन : कारकीर्दीचा ९०० वा सामना जिंकत जोकोविचची आगेकूच - नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन न्यूज

शुक्रवारी रॉड लेवर एरिना येथे खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात जोकोविचने जपानच्या निशिओकाला ६-३, ६-२, ६-२ असे सहज हरवले. हा सामना ८५ मिनिटे रंगला होता.

djokovic reaches his 50th Grand Slam round of 16 as he beats Nishioka
ऑस्ट्रेलियन ओपन : कारकिर्दीचा ९०० वा सामना जिंकत जोकोविचची आगेकूच

By

Published : Jan 24, 2020, 5:17 PM IST

मेलबर्न - टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. सर्बियाची शान असलेल्या जोकोविचने कारकीर्दीचा ९०० वा सामना जिंकत या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश नोंदवला.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियन ओपन : १५ वर्षाच्या कोकोचा गतविजेत्या ओसाकाला धक्का!

शुक्रवारी रॉड लेवर एरिना येथे खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात जोकोविचने जपानच्या निशिओकाला ६-३, ६-२, ६-२ असे सहज हरवले. हा सामना ८५ मिनिटे रंगला होता. या विजयासह जोकोविच आता फेडररनंतर मोठ्या स्पर्धेच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये ५० वेळा प्रवेश नोंदवणारा खेळाडू ठरला आहे.

पुढच्या फेरीसाठी जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या दिएगो श्वार्ट्झमने जोकोविचला आव्हान असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details