महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सिनसिनाटी मास्टर्स: नोवाक जोकोविच, अॅश्ले बार्टीला पराभवचा धक्का, 'या' खेळाडूंमध्ये अंतिम सामना - Cincinnati Masters 2019

नोवाक जोकोविच हा जागतिक क्रमवारीत १ नंबरवर आहेत तर मेदवेदेव्हने हा ९ क्रमांकावर आहे. त्याने जोकोविचचा पराभव करत सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे.

सिनसिनाटी मास्टर्स: नोवाक जोकोविच, अॅश्ले बार्टीला पराभवचा धक्का, 'या' खेळाडूंमध्ये अंतिम सामना

By

Published : Aug 18, 2019, 3:17 PM IST

सिनसिनाटी - सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचला रशियाच्या डेनिल मेदवेदेव्हने ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला.

नोवाक जोकोविच हा जागतिक क्रमवारीत १ नंबरवर आहेत तर मेदवेदेव्हने हा ९ क्रमांकावर आहे. त्याने जोकोविचचा पराभव करत सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे.

स्पर्धेचा अंतिम सामना मेदवेदेव्ह विरुध्द बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन यांच्यात होईल. गोफिन याने उपांत्य फेरीत रिचर्ड गास्केट याचा ६-३, ६-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

महिला गटात फ्रेंच ओपन विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमाकांवर असलेली अॅश्ले बार्टी हिला पराभूत व्हावे लागले. तिला २ वेळा ग्रँण्डस्लॅम विजेती ठरलेली रशियाची सुप्रसिद्ध टेनिसपटू स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने ६-२, ६-४ असा पराभव केला.

यापूर्वी या स्पर्धेत स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानी असलेल्या अँड्रे रूब्लेव्ह याने फेडररचा स्पर्धेच्या ‘राऊंड ऑफ १६’ च्या फेरीत ६-३, ६-४ असा एकतर्फी पराभव केला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details