महाराष्ट्र

maharashtra

ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने अ‍ॅड्रिन टूरच्या आयोजकांना फटकारले

By

Published : Jun 22, 2020, 7:36 PM IST

या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली आहे. "स्पर्धा घेण्याचा मूर्खपणाचा निर्णय. मित्रांनो तुम्ही लवकरच बरे व्हाल. आपण जेव्हा प्रोटोकॉल पाळत नाही तेव्हा असे होते."

Australia's nick kyrgios slams hosts of adrien tour
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने अ‍ॅड्रिन टूरच्या आयोजकांना फटकारले

कॅनबेरा - अ‍ॅड्रिन टूरमध्ये भाग घेतलेल्या दोन टेनिसपटूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने या स्पर्धेच्या आयोजकांना धारेवर धरले आहे. बल्गेरियाचा टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव्ह कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, दुसर्‍या दिवशी क्रोएशियाच्या बार्ना कोरिकलाही कोरोनाव्हायरसचा फटका बसला. दिमित्रोव्ह आणि कोरिक या दोघांनीही अ‌ॅड्रिया टूर प्रदर्शन टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत नोव्हाक जोकोविच, अलेक्झांडर ज्वेरेव आणि डोमिनिक थिम देखील खेळले होते.

या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली आहे. "स्पर्धा घेण्याचा मूर्खपणाचा निर्णय. मित्रांनो तुम्ही लवकरच बरे व्हाल. आपण जेव्हा प्रोटोकॉल पाळत नाही तेव्हा असे होते."

स्पर्धेचा पुढील टप्पा आता रद्द करण्यात आला आहे. पुढचा टप्पा क्रोएशियाच्या जादर येथे होणार होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविच आणि आंद्रे रुबलेव एकमेकांसमोर उभे ठाकणार होते.

रविवारी दिमित्रोव्हने इंस्टाग्रामवर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, सोमवारी, कोरिकने ट्विटरवर आपल्या चाचणीची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details