महाराष्ट्र

maharashtra

जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले माद्रिद ओपनचे विजेतेपद

By

Published : May 9, 2021, 3:19 PM IST

Updated : May 9, 2021, 3:31 PM IST

बेलारूसची स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने माद्रिद ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

aryna-sabalenka-became-madrid-open-champion-by-defeating-world-number-1-tennis-player-ashleigh-barty
जगातील अव्वल टेनिसपटू अश्ले बार्टीचा पराभव करत आर्यनाने पटकावले मॅड्रिड ओपनचे विजेतेपद

माद्रिद- बेलारूसची स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने माद्रिद ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची खेळाडू अश्ले बार्टीचा धुव्वा उडवला.

एका रिपोर्टनुसार, बार्टीने दोन आठवड्याआधी सबालेंकाविरुद्धच्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर शानदार वापसी करत सबालेंकाचा पराभव केला होता. ही लय ती माद्रिद ओपनमध्ये देखील कायम ठेवेल ही आशा होती. परंतु, जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सबालेंका हिने बार्टीला पराभवाचा जोरदार धक्का दिला.

शनिवारी रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात सबालेंकाने बार्टीचा ६-०, ३-६, ६-४ अशा फरकाने पराभव करत १०वे विजेतेपद पटकावले. बार्टीने याआधी क्ले कोर्टवर तब्बल २ वर्षात एकही सामना गमावला नव्हता. बार्टीच्या या विजयी रथाला सबालेंकाने ब्रेक लावला.

विजेतेपद पटकावल्यानंतर सबालेंका म्हणाली की, 'क्ले कोर्टवर खेळणे माझ्यासाठी योग्य नाही, अशा विचार मी सुरूवातीला करत होते. कारण या कोर्टवर खेळणे खूपच कठीण आहे. या कोर्टवर खूप श्रम घ्यावं लागतं. पण या वर्षी माझे विचार एकदम बदलले आता मी या कोर्टवर खेळण्यास भीत नाही.'

हेही वाचा -सबालेंका मॅड्रिड ओपनच्या अंतिम फेरीत, बार्टीशी होणार सामना

हेही वाचा -टेनिस प्रीमियर लीगमध्ये यूकी भांबरी करणार दिल्लीचे नेतृत्व

Last Updated : May 9, 2021, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details