लंडन - यंदाची आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडने जिंकली. या पहिल्यावहिल्या विश्वकरंडक विजयामुळे इंग्लंडच्या संघाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचनेदेखील इंग्लंडला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
WWE चा सुपरस्टार ट्रिपल एचने दिल्या विश्वकरंडक विजेत्या संघाला खास शुभेच्छा!
ट्रिपल एचने ट्विटवरून खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड संघाला भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्रिपल एचने ट्विटवरून खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट इंग्लंड संघाला भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने म्हटले आहे, 'अतुलनीय स्पर्धा आणि जबरदस्त अंतिम सामना. आयसीसी 2019 विश्वकरंडकाचे विजेतेपद मिळवल्याबद्दल इंग्लंडला शुभेच्छा. हा खास कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट तुमच्यासाठी.’
ट्रिपल एच हा डब्ल्यूडब्ल्यूईचा सीईओ आणि माजी कुस्तीपटू आहे. त्याने या आधी अशाप्रकारची भेट मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला एक कस्टम चॅम्पियन दिली होती.