नवी दिल्ली : महिला प्रीमिअर लिग WPL च्या पहिल्या सत्रात पाच संघांमध्ये 22 सामने खेळवले जाणार आहेत. 23 दिवस चालणाऱ्या WPL च्या 22 पैकी 11 सामने मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळवले जातील. ब्रेबॉर्न येथे पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे आणि त्यात किती प्रेक्षक सामना पाहू शकतात, ते जाणून घेऊया.
समुद्रकिनारीस्टेडियम :ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) अंतर्गत आहे. या स्टेडियममध्ये 20,000 प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहू शकतात. येथील खेळपट्टी लाल मातीची आहे. त्यावर फलंदाजी आणि गोलंदाजी करणे सोपे आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईत समुद्रकिनारी आहे. त्यामुळेच WPL सामन्यांदरम्यान येथे उष्णता आणि जास्त आर्द्रता दिसून येते. रात्रीच्या वेळीही येथे दव पडते. ब्रेबॉर्नच्या सीमा लहान आहेत आणि आउटफिल्ड वेगवान आहे.
एकच सामना खेळला:ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक टी-20 सामना खेळला गेला, एक टी-20 सामना आतापर्यंत मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला आहे. 20 ऑक्टोबर 2007 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना झाला होता. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पाच गडी गमावून 166 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १८.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.
माजी गव्हर्नरच्या नावाने मैदान :स्टेडियमचे नाव गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावावर आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमचे नाव मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावावर आहे. हे स्टेडियम ७ डिसेंबर १९३७ रोजी पूर्ण झाले. येथे पहिला सामना सीसीआय आणि लॉर्ड टेनिसन संघ यांच्यात झाला. ब्रेबॉर्न हे दोन वर्षे बंगालचे राज्यपालही होते. ब्रेबॉर्न मैदानावर प्रथमच WPL सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामना याच मैदानावर होणार आहे.
नुकतेच झाले शेड्यूल जाहीर :देशात होणाऱ्या पहिल्या WPL 2023 साठी सोमवारी 87 खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. या दरम्यान एकूण 87 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 विदेशी महिला खेळाडूंचा समावेश असणार. स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या काळात विकल्या गेलेल्या तीन सर्वात महागड्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत, तर परदेशी खेळाडूंमध्ये अॅशले गार्डनर, नॅट स्कायव्हर-ब्रंट आणि बेथ मुनी यांची नावे समोर आली होती.
कोणत्या संघानेखरेदी केलेखेळाडू : या लिलावादरम्यान, WPL 2023 साठी खेळायला जाणार्या पहिल्या 5 संघांच्या मालकांनी आणि सहायक कर्मचार्यांनी निवडलेल्या खेळाडूंवर बोली लावली आणि संघाचे संयोजन करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सने प्रत्येकी 18 खेळाडूंसाठी बोली लावली, तर युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 6 परदेशी खेळाडूंसह प्रत्येकी 16 खेळाडू खरेदी केले, तर मुंबई इंडियन्स संघाने एकूण 17 महिला खेळाडूंना आपल्या संघात ठेवले.
हेही वाचा : Captain Harmanpreet Bad Luck : आम्ही सामन्यात विजयाच्या दिशेने असताना, मी ज्या प्रकारे रनआऊट झाले त्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही : हरमनप्रीत कौर