महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक - world athletics championships 2022 india

Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अ‍ॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या कामगिरीने त्याने या स्पर्धेतील भारताचा कित्येक वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपविला आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra

By

Published : Jul 24, 2022, 8:38 AM IST

Updated : Jul 24, 2022, 1:33 PM IST

यूजीन - यूजीन, यूएसए येथे 18 व्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत ८८.१३ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनून इतिहास रचला. अँडरसन पीटर्सने सर्वोत्तम प्रयत्न करून सुवर्णपदक (90.46 मीटर) जिंकले.

दुसरे स्थान कायम -नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल होता. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने 82.39 मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये नीरजने 86.37 मीटर, चौथ्या प्रयत्नात नीरजने 88.13 मीटर फेक केली, तर पाचव्या फेरीत तो अपयशी ठरला. ( Neeraj Chopra, World Athletics Championships ) त्याचा पहिला फेक फाऊल घोषित करण्यात आला. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८८.१३ मीटर होती. दुसरे स्थान कायम राखत रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.

ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला.

नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला. भारताच्या एकाही अ‍ॅथलेटिक्स गेल्या 19 वर्षांत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आले नव्हते. 2003 सालच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलेटिक्स वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजने सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकले आहे.

तीनदा 90 चा टप्पा ओलांडला - या स्पर्धेत नीरज चोप्राला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सकडून कडवे आव्हान मिळणार, असे मानले जात होते. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हा सध्या जगज्जेता आहे. या महिन्याच्या सुरुवातीस स्टॉकहोममध्ये नीरज चोप्राला पराभूत करून, सुवर्णपदक जिंकताना त्याने यावर्षी तीनदा 90 चा टप्पा ओलांडला होता.

हेही वाचा -WHO on Monkeypox: मंकीपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी-जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा

Last Updated : Jul 24, 2022, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details