महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : 24 जुलै भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरणार? - sania mirza

टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघासह बॉक्सर, बॅडमिंटनपटू, नेमबाज आणि वेटलिफ्टर यांचे सामने होणार आहेत.

why-24th-july-may-be-the-most-historic-day-in-indian-sports-history-at-tokyo-olympics
Tokyo Olympics Day 2: 24 जुलै भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरणार?

By

Published : Jul 23, 2021, 7:28 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतीय अॅथलेटिक्स 10 क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. यात भारतीय पुरूष आणि महिला हॉकी संघ आपल्या अभियानाला सुरूवात करतील. तसेच बॉक्सर, बॅडमिंटनपटू, नेमबाज, ज्यूडो, टेबल टेनिस, नौकानयन, वेटलिफ्टर आणि तिरंदाज यांचे देखील सामने होणार आहेत. जाणून घ्या दुसऱ्या दिवशीचे संपूर्ण शेड्यूल...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये उद्या 24 जुलै रोजीचे संपूर्ण शेड्यूल (भारतीय वेळेनुसार)

  • तिरंदाज -

सकाळी सहा वाजता मिक्स्ड टीम एलिमिनेशन (प्रविण जाधव, दीपिका कुमारी)

  • ज्यूडो -

सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी - 48 किलो एलिमिनेशन राउंड ऑफ 32 (सुशीला देवी)

  • बॉक्सिंग -

सकाळी 8 वाजता - महिला वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (लवलिना बोर्गोहेन)

सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी - पुरूष वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (विकास कृष्ण)

  • हॉकी -

सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी - पुरूष गट अ - भारत वि. न्यूझीलंड सामना

सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी महिला गट अ - भारत वि. नेदरलँड सामना

  • टेबल टेनिस -

पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी पुरूष आणि महिला एकेरी फेरी 1 (जी साथियान, शरथ कमल, मनिका बत्रा, सुतिर्थ मुखर्जी)

सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी - मिक्स्ड डबल राउंड ऑफ 16 (शरथ कमल/मनिका बत्रा)

  • नौकानयन -

सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी - पुरूष लाइटवेट डबल स्कल्स हीट (अर्जुन लाल, अरविंद सिंह)

  • बॅडमिंटन -

सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी - पुरूष डबल्स ग्रुप स्टेज - ग्रुप अ (सात्विक साईराज रंका रेड्डी/ चिराश शेट्टी वि. ली यांग/वांग ची लीन)

सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी - पुरूष एकेरी ग्रप स्टेज - ग्रुप डी (साई प्रणीत वि. जिल्बरमॅन मिशा)

  • नेमबाजी -

सकाळी 5 वाजता - महिला 10 मीटर एअर रायफल पात्रता (एलावेनिल वालारिवन, अपूर्वी चंदेला)

सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी - महिला 10 मीटर एअर रायफल फायनल (एलावेनिल वालारिवन, अपूर्वी चंदेला जर पात्र ठरले तर)

सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी - पुरूष 10 मीटर एअर पिस्टल पात्रता - (सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा)

दुपारी 12 वाजता - पुरूष 10 मीटर एअर पिस्टर फायनल (सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा पात्र ठरले तर)

  • टेनिस -

महिला दुहेरी - सानिया मिर्झा, अंकिता रैना

पुरूष एकेरी - सुमित नागल

  • वेटलिफ्टिंग -

सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी महिला 49 किलो मेडल राउंड (मीराबाई चानू)

ABOUT THE AUTHOR

...view details