आपिया - भारताच्या 16 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने युवा राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत नुकतेच तीन विक्रम रचले होते. त्याच्यानंतर आता वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने याच स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
भारताच्या प्रदीपने ३५० किलो वजन उचलत रचला विक्रम! - Gold
प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धांमधील आधीचा विक्रम मोडीत काढला.
प्रदीपने क्लीन अँड जर्क प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धांमधील आधीचा विक्रम मोडीत काढला. त्याने 109 किलो वजनी गटात 202 किलो वजन उचलले. सुरुवातीला त्याने 148 किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याने एकूण ३५० किलो वजन उचलत विक्रम प्रस्थापित केला.
आपिया येथे चालू असेलल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत युवा गटातील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक असलेल्या जेरेमीने पराक्रम केला होता. त्याने ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलताना युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील आपलेच विक्रम मोडीत काढले.