महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धाकड गर्ल...विनेश फोगाटने जिंकले दुसरे सुवर्णपदक

कॉमनवेल्थ आणि एशिअन स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेशने एकेतरीनाचा 9-4 ने पराभव केला. विनेशसह भारताच्या दीपक पूनियाने रौप्य, तर सुमीतने ब्राँझपदक मिळवले.

धाकड गर्ल...विनेश फोगाटने जिंकले दुसरे सुवर्णपदक

By

Published : Jul 17, 2019, 9:04 PM IST

नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. तिने यासीर दागू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 53 किलो वजनी गटात रुसची कुस्तीपटू एकेतरीना हिचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

कॉमनवेल्थ आणि एशिअन स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेशने एकेतरीनाचा 9-4 ने पराभव केला. विनेशसह भारताच्या दीपक पूनियाने रौप्य, तर सुमीतने ब्राँझपदक मिळवले.

दीपकला 86 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत अझबैझानच्या ऍलेक्‍झांड्रा गुस्ताव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सुमीतने 125 किलो वजनी गटात ब्राँझपदक जिंकले. विनेशने मागील आठवड्यात स्पेन ग्रांप्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details