मुंबई -अमेरिकेनेऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा 100 पदकाचा टप्पा पार केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज शनिवारी अमेरिकेने 100 वे पदक जिंकले. दरम्यान, सर्वात जास्त पदकं जिंकून देखील अमेरिका पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चीन त्यांच्यापेक्षा कमी पदकं जिंकत पहिल्या स्थानावर आहे. याचे कारण आहे की, चीनने अमेरिकापेक्षा जास्त सुवर्ण पदकं जिंकली आहेत. पदकतालिकेत सर्वात जास्त सुवर्ण पदकं जिंकणारा संघ अव्वल ठरतो. भारत या तालिकेत 66व्या स्थानावर आहे.
टोकियो ऑलिम्पिक 23 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या काळात होत आहे. अमेरिकेने आजपर्यंत 100 हून अधिक पदकं जिंकली. त्यांनी बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करत 32वे सुवर्ण आणि 100वे पदक जिंकले.
अमेरिकेने सर्वाधिक रौप्य पदकं जिंकली आहेत. त्यांनी 36 रौप्य पदके जिंकली आहेत. तसेच 32 कास्य पदक देखील त्यांच्या नावे आहेत. यामुळे त्यांचे पदकतालिकेत नुकसान झालं आहे. चीन 37 सुवर्ण पदकासह 81 पदके जिंकत पहिल्या स्थानावर आहे. तर अमेरिका 31 सुवर्ण पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. जपान 24 सुवर्णांसह 51 पदके जिंकत तिसऱ्या स्थानी आहे.