महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल आणि सोनलबेन पटेलचा पराभव

भारताची टोकियो पॅराऑलिम्पिकमधील अभियानाला टेबल टेनिस खेळाने सुरुवात झाली. यात सोनलबेन पटेल आणि भाविनाबेन पटेल यांनी आपापले सामने खेळले. पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला.

Tokyo Paralympics: Paddler Bhavinaben patel and Sonalben patel loses to China's Zhou Ying by 3-0
Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल आणि सोनलबेन पटेलचा पराभव

By

Published : Aug 25, 2021, 4:45 PM IST

टोकियो - भारताची टोकियो पॅराऑलिम्पिकमधील अभियानाला टेबल टेनिस खेळाने सुरुवात झाली. यात सोनलबेन पटेल आणि भाविनाबेन पटेल यांनी आपापले सामने खेळले. पण या सामन्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान, दोन्ही खेळाडूंची चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

महिला वैयक्तिक टेबल टेनिस सी-4 मध्ये भारताच्या भाविनाबेन पटेलचा सामना चीनच्या यिंग झोउ हिच्याशी झाला. तर सोनलबेन पटेलची गाठ महिला एकेरी वर्ग 3 च्या ग्रुप डी मध्ये चीनच्या कियाम ली हिच्याशी पडली.

महिला सिंगल्स क्लास-4 ग्रुप ए मधील सामन्यात भाविनाबेन पटेलला चीनच्या झोउ यिंग हिने 3-0 ने पराभूत केले. सामन्याच्या सुरूवातीपासून चीनी खेळाडूने सामन्यावर वर्चस्व राखले. यिंगने पहिला सेट फक्त 5 मिनिटात 11-3 असा जिंकला. हाच धडाका त्याने अखेरपर्यंत कायम ठेवला आणि पुढील सेट 11-9, 11-2 असे जिंकत पुढील फेरी गाठली. आता भाविनाचा पुढील सामना उद्या गुरूवारी दुसऱ्या ग्रुपमधील ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूशी होणार आहे.

दरम्यान, चीनची झोउ यिंग मातब्बर खेळाडू आहे. तिने 2008 आणि 2012 स्पर्धेत पदक जिंकलं आहे.

सोनलबेन पटेलचा पराभव -

भाविना पटेलच्या सामन्याआधी सोनलबेन पटेलचा सामना झाला. या सामन्यात सोनलबेन पटेलचा 3-2 ने पराभव झाला. सोनलबेनने या सामन्यात चीनी खेळाडूला चांगले झुंजवले. पण ती विजय मिळवू शकली नाही. सोनलबेनचा 11-9, 3-11, 17-15, 7-11, 4-11 अशा फरकाने पराभव झाला.

हेही वाचा -Tokyo Paralympics मधील भारतीय खेळाडूंसाठी विराट कोहलीचा खास संदेश

हेही वाचा -देवेंद्र झाझरियासह 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details