मुंबई - भारताची भाविनाबेन पटेल हिने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस खेळात रौप्य पदक जिंकले. भाविनाबेनला अंतिम सामन्यात चीनच्या यिंगकडून पराभूत व्हावे लागले. यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भाविनाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय नेते, खेळाडू आणि बॉलीवूड स्टार भाविनाबेनचे अभिनंदन करत आहेत.
चीनच्या झोउ यिंगने सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भाविनाबेन पटेलचा 3-0 ने सरळ सेटमध्ये पराभव केला. पण रौप्य पदकासह भाविनाबेन टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली. यानंतर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राने भाविनाबेनचे कौतुक केले. दरम्यान, अभिनव बिंद्राने 2008 ऑलिम्पिकमध्ये शुटिंग खेळात सुवर्ण पदक जिंकले होते.
भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राने ट्विट केले आहे. यात तो म्हणतो, रौप्य पदक जिंकत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने आणि टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक विजेता बनल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सर्व समस्यांना तोंड देत टोकियो अशी कामगिरी केल्याने संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.