मुंबई - भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक हे सुवर्ण पदकामध्ये बदलण्याच्या आशा वाढल्या आहेत. 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक विजेती झीहुई हाउ हिची डोपिंग चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. या गटात चीनची झीहुई हाउने एकूण 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनिशायाच्या विंडी केटिका आयशाह 194 किलो वजन उचलत कांस्य पदकाची विजेती ठरली. सुवर्णपदक विजेती झीहुई हाउ हिची अँटी डोपिंग अधिकाऱ्यांकडून चाचणी करण्यात येणार आहे. यात जर झीहुई हाउ दोषी आढळली तर तिच्याकडून सुवर्णपदक काढून घेतलं जाईल.