महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2021, 1:05 PM IST

ETV Bharat / sports

Tokyo Olympics: 13 वर्षीय मोमीजी निशिया नाही तर 'हा' आहे सर्वात युवा अॅथलिट

जपानची मोमीजी निशिया हिचे वय 13 वर्ष 330 दिवस असून तिने महिला वैयक्तिक स्केट बोर्डींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. या सुवर्ण कामगिरीसह मोमीजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी सर्वात कमी वयाची अॅथेलिट ठरली.

tokyo olympics 2020 : youngst-summer-medallists-of-all-time-1896-to-2021
Tokyo Olympics: 13 वर्षीय मोमीजी निशिया नाही तर 'हा' आहे सर्वात युवा अॅथलिट

मुंबई - सर्वसाधारणपणे ज्या वयात मुलं खेळणी किंवा व्हिडिओ गेम्स खेळतात, अशा वयात दोन मुलींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. एकीचे नाव मोमीजी निशिया तर दुसरीचे रेसा लील असे आहे. या दोघी प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाल्या असून पहिल्याच वर्षी त्यांनी पदक जिंकलं आहे.

जपानची मोमीजी निशिया हिचे वय 13 वर्ष 330 दिवस असून तिने महिला वैयक्तिक स्केट बोर्डींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. या सुवर्ण कामगिरीसह मोमीजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी सर्वात कमी वयाची अॅथेलिट ठरली. दुसरीकडे याच खेळात ब्राझीलच्या रेसा लील हिने रौप्य पदक जिंकले. तिचे वय 13 वर्ष 203 दिवस आहे.

आता आम्ही तुम्हाला ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाचे खेळाडू, ज्यांनी पदक जिंकलं आहे, त्याबद्दल सांगणार आहोत.

1896 अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत यूनानचा जिम्नेस्टिक दिमित्रोस लोंड्रास हा सर्वात युवा अॅथलिट ठरला. त्याचे वय 10 वर्ष 216 दिवस होते. तो जिम्नास्टिकमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला.

एम्सटर्डम ऑलिम्पिक 1928 मध्ये इटलीचा लुगीना गियावोट्टी आर्टिस्टिक जिम्नास्टिक म्हणून सहभागी झाला होता. त्यावेळी त्याचे वय 11 वर्ष 301 दिवस होते. याच ऑलिम्पिकमध्ये इटलीच्या दुसरा ऑर्टिस्टिक जिम्नास्टिक सहभागी झाला होता. त्याचे नाव इनेस वर्सेसी असे होते. इनेसचे वय 12 वर्ष 216 दिवस होते. याशिवाय इटलीच्याच कारला मारनगोनीचे वय 12 वर्ष 269 दिवस होते. अमेरिकेचा जलतरणपटू डोरोथी पोयनटन हिल याचे वय 13 वर्ष 23 दिवस होते.

बर्लिन ऑलिम्पिक 1936 मध्ये दोन कमी वयाचे खेळाडू सहभागी झाले होते. ज्यात डेन्मार्कचा जलतरणपटू इंग सोरेनसेन आहे. त्याचे वय त्यावेळी 12 वर्ष 21 दिवस होते. दुसरा खेळाडू अमेरिकेचा होता. मार्जोरी गेस्ट्रिगं त्याचे वय 13 वर्ष 268 दिवस होते.

रोम ऑलिम्पिक 1960 मध्ये रोइंग क्रीडा प्रकारात जर्मनीचा क्लाउस जेरता सहभागी झाला होता. त्यावेळी त्याचे वय 13 वर्ष 280 दिवस होते.

हेही वाचा -Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी संघाची पराभवाची मालिका सुरूच, ब्रिटन 4-1 ने विजयी

हेही वाचा -मनिका बत्राला ऑलिम्पिकमधील 'ती' चूक महागात पडणार, टेबल टेनिस संघ कारवाईच्या तयारीत

ABOUT THE AUTHOR

...view details