महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : मंगोलियाच्या खेळाडूचा पराभव झाला, पण पदकाची संधी हुकली भारतीय सोनमची, कसं काय?

अनेकांना प्रश्न पडला असेल की, कुस्तीपटू सोनम मलिक उपांत्य फेरीत देखील पोहोचली नव्हती, पण तिची कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी कशी हुलकी. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देऊ...

Tokyo Olympics 2020: Wrestler Sonam Malik loses opening bout, out of repechage round
Tokyo Olympics : मंगोलियाच्या खेळाडूचा पराभव झाला, पण पदकाची संधी हुकली भारतीय सोनमची, कसं काय?

By

Published : Aug 3, 2021, 10:57 AM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू सोनम मलिक हिची कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी हुकली आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, सोनम उपांत्य फेरीत देखील पोहोचली नव्हती पण तिची कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी कशी हुलकी. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देऊ...

महिला कुस्तीपटू सोनम मलिक फ्री स्टाइल कुस्तीच्या 62 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत होती. तिचा सामना मंगोलियाच्या बोलोर्टूया हिच्याशी झाला. या सामन्यात चांगली सुरुवात करून देखील तिचा पराभव झाला. मंगोलियाची खेळाडू टेकनिकल पाँईंटच्या आधारे विजयी ठरली. दरम्यान, सिंधून जरी सामना गमवला तरी तिला कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी होती.

सोनमला कांस्य पदक जिंकण्याची संधी कशी होती?

कुस्तीमध्ये रेपेचाजमध्ये सोनमला कांस्य पदकाची संधी होती. जुडो, तायक्वोंदो आणि कुस्तीमध्ये दोन-दोन कांस्य पदक दिले जातात. पण यात कांस्य पदकाच्या विजेत्यांचा निर्णय उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन खेळाडू आणि दोन फायनलिस्ट खेळाडूंनी आधीच्या राउंडमध्ये पराभूत केलेल्या खेळाडूंच्या रेपेचाज सामन्याच्या आधारे होतो.

हा रेपेचाज आहे तरी काय हे आपण उदाहणासह समजून घेऊ

भारतीय खेळाडू सोनम मलिक मंगोलियाच्या खेळाडूकडून पराभूत झाली. जर मंगोलियाची खेळाडूने अंतिम फेरी गाठली असती तर सोनमला रेपेचाज सामना खेळण्याची संधी मिळाली असती. पण मंगोलियाची खेळाडू उपांत्य फेरीत पराभूत झाली. यामुळे सोनमला कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, कुस्तीमधील रेपेचाजला समजणे थोडेसे कठीण आहे. कुस्तीमध्ये रेपेचाज 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सामिल करण्यात आला आहे. या नियमाच्या आधारावर भारताच्या अनेक कुस्तीपटूंनी पदक जिंकलं आहे. यात सुशील कुमार याने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर योगेश्वर दत्त याने रिओ ऑलिम्पिक तर साक्षी मलिक याने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

हेही वाचा -Tokyo Olympics: भारताची भालाफोकपटू अन्नू राणी अंतिम फेरीत पोहोचण्यास अपयशी

हेही वाचा -Tokyo Olympic : उपांत्य फेरीतील पराभवानंतर मोदींनी केला भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराला फोन

ABOUT THE AUTHOR

...view details