महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics: सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारी ही मुलगी आहे तरी कोण? - सुंदर खेळाडू फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुलीपैकी एक आहे तझुयू. व्हायरल फोटोत तझुयू तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतलेली पाहायला मिळत आहे. तिला कोणी कोरियाची तिरंदाज तर कोणी चीनची असल्याचे म्हणत आहे. पंरतु तझुयू हिचा ऑलिम्पिकशी काही संबंध नाही.

tokyo-olympics-2020-tzuyu-goes-viral-getting-mistaken-olympic-archer
Tokyo Olympics: सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारी ही मुलगी आहे तरी कोण?

By

Published : Aug 3, 2021, 3:24 PM IST

मुंबई - जपानच्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. खेळाडूंच्या या महाकुंभ मेळ्यात खेळाडू चांगली कामगिरी करत आपली वाहवा मिळवत आहेत. या दरम्यान, काही सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या फोटोमधील काही मुलींचा तर ऑलिम्पिकशी काही संबंध देखील नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुलीपैकी एक आहे तझुयू. व्हायरल फोटोत तझुयू तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतलेली पाहायला मिळत आहे. तिला कोणी कोरियाची तिरंदाज तर कोणी चीनची असल्याचे म्हणत आहे. पंरतु तझुयू हिचा ऑलिम्पिकशी काही संबंध नाही.

ब्राझीलच्या एका पत्रकाराने ट्विट केलं आहे. यात तो म्हणतो, माझ्या मित्राला वाटलं की, तझुयू तिरंदाज आहे आणि त्याने मला व्हायरल ट्विट पाठवलं. मग मला त्याला सांगावं लागलं की, तझुयू एक आयडल आहे आणि तिने आयडल स्टार अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतलं होतं.

तझुयू हिचे फोटो आणि व्हिडिओ तेव्हाचे आहेत, जेव्हा तिने आयडल स्टार अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला होता. हा व्हिडिओ 2019 मधील आहे. तझुयू ही तैवानची असून ती सिंगर देखील आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : बेल्जियमकडून पराभवानंतर खेळाडू गुरूजंत सिंगच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर

हेही वाचा -Tokyo Olympic : काय आम्ही सुवर्ण पदक विभागून घेऊ शकतो, खेळाडूचा प्रश्न; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details