महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics: पुरुष तिरंदाजांच्या सुमार कामगिरीचा भारताला फटका; मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये होणार तोटा - Archery Mixed Team event

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी सुमार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका भारतीय संघाला मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये झाला असून भारतीय संघ नवव्या स्थानावर घसरला आहे.

Tokyo Olympics 2020 : Pravin Jadhav to compete with Deepika Kumari at Archery Mixed Team event
Tokyo Olympics 2020 : Pravin Jadhav to compete with Deepika Kumari at Archery Mixed Team event

By

Published : Jul 23, 2021, 3:35 PM IST

Updated : Jul 23, 2021, 3:48 PM IST

टोकियो - भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी खेळाने श्रीगणेशा केला. मात्र भारतीय तिरंदाजांनी सुमार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका भारतीय संघाला मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये झाला असून भारतीय संघ नवव्या स्थानावर घसरला आहे.

पहिल्या दिवशी महिलांच्या वैयक्तिक गटात दीपिका कुमारीने नववे स्थान मिळवले. तर पुरूष गटात तरुणदीप, अतनु दास आणि साताऱ्याचा मराठमोळा प्रविण जाधव या तिघांना काही खास कामगिरी करता आली नाही. हे तिघेही टॉप-25 मध्ये पोहचू शकले नाहीत. यामुळे मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारतीय संघाचे नुकसान झाले आणि टीम नवव्या स्थानावर घसरली.

प्रविण जाधव 'या' स्थानावर

पुरूष तिरंदाजीत सर्वात चांगली रॅकिंग प्रविण जाधवने मिळवली. त्याने 656 गुणांसह 31वे स्थान पटकावले. तर अतनु दासने 653 गुणांसह 35वे स्थान मिळवले. तरुणदीप 652 गुणांसह 37व्या स्थानावर राहिला. दरम्यान, भारतीय तिरंदाजाची ही कामगिरी सुमार अशी असल्याचे म्हणता येईल.

मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये प्रविण जाधवसोबत दीपिका कुमारी

भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये अतनु दास नाही, तर प्रविण जाधवसोबत मिळून खेळणार आहे. पुरुष तिरंदाज राउंडमध्ये प्रविणने अतनुपेक्षा चांगले गुण घेत 31वे स्थान पटकावले. तर अतनु 35व्या स्थानावर राहिला. प्रविणची कामगिरी अतनूपेक्षा चांगली असल्याने त्याला दीपिका कुमारीसोबत मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये स्थान मिळालं आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : दीपिका कुमारी रँकिंग राउंडमध्ये 9व्या स्थानी; कोरियन तिरंदाजांचा दबदबा

हेही वाचा -Tokyo Olympic : महाराष्ट्राचा प्रविण जाधव 31व्या स्थानावर; अतनूने मिळवले 35वे स्थान

Last Updated : Jul 23, 2021, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details