टोकियो - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकलं. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान, अॅथलेटिक्स प्रकारात भारतीय खेळाडूने जिंकलेले हे पहिलं पदक आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय अॅथलीटला करता आलेली नाही. तसेच २००८ ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलं होते. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.
नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भाला फेकला. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. चेक रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला आणि त्याने 81.16 मीटर लांब भाला फेकला. अंतिम फेरीत नीरजसह 12 खेळाडू होते. परंतु यातील एकाही खेळाडूला नीरजपेक्षा लांब भाला फेकता आला नाही.
दुसऱ्या प्रयत्नात नीरजने आपलाच विक्रम मोडला. त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकला. त्यानंतर त्याचा हा विक्रम इतर खेळाडूंना राहिलेल्या प्रयत्नात मोडता आला नाही. चेक रिपब्लिकच्या जाकुब याने 86.67 मीटर लांब भाला फेकला. परंतु तो नीरजच्या पुढे जाऊ शकला नाही. त्याला दुसऱ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले.
पुरूष भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. तर चेक रिपब्लिकचा जाकुब रोप्य पदकाचा मानकरी ठरला. तर चेक रिपब्लिकचा दुसरा खेळाडू वेसलीला कास्य पदक मिळालं. पाकिस्तानचा अर्शद नदीम 5व्या स्थानावर राहिला.
पात्रता फेरीत नीरजने फेकला 86 मीटर लांब भाला
नीरज सद्या तुफान फार्मात आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत 86.65 मीटर लांब भाला फेकला. तो पात्रता फेरीत ग्रुप ए आणि ग्रुप बी मिळून पहिल्या स्थानावर होता. नीरजचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन 88.06 इतके आहे. त्याने हा थ्रो आशियाई क्रीडा स्पर्धेत केला होता. त्यावेळी तो सुवर्ण विजेता ठरला.
जर्मन प्रशिक्षकाकडून घेतली ट्रेनिंग -