महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : काय खरचं मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?, जाणून घ्या सत्यता

tokyo-olympics-2020-mirabai-chanu-silver-updated-to-gold-rumors-on-twitter
Tokyo Olympics : काय खरचं मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?, जाणून घ्या सत्यता

By

Published : Jul 26, 2021, 3:12 PM IST

मुंबई - भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूला रौप्य पदकाऐवजी सुवर्ण पदक मिळणार, या वृत्ताला पेव फुटले आहे. खरचं जर असे घटलं तर मीराबाई चानू ऑलिम्पिकमध्ये, सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरेल. दरम्यान, हे सर्व प्रकरण काय हे ते जाणून घेऊयात...

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. या गटात चीनची झीहुई हाउने एकूण 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनिशायाची विंडी केटिका आयशाह 194 किलो वजन उचलत कांस्य पदकाची विजेती ठरली.

मीराबाईंना सुवर्णपदक मिळणार ही अफवा ट्विटरच्या माध्यमातून पसरली. अमेरिकेच्या एका नागरिक ज्याचे नाव, कायल बैस आहे, त्याच्या नावे एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लिहलं आहे की, सुवर्ण पदक विजेता झीहुईची डोपिंग चाचणी होईल.

कायलने त्याच्या बायोमध्ये लिहलं की, तो हेमेन कॅपिटल मॅनेजमेंटचा चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर आहे. यानंतर कायलच्या ट्विटचा आधार घेत मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार ही बातमी व्हायरल होऊ लागली.

आता खरोखर झीहुईची डोपिंग चाचणी झाली का?

ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूपैकी 5000 खेळाडूंची रॅडम डोपिंग चाचणी करण्यात आली आहे. यात सामन्याआधी आणि सामन्यानंतरचे स्वॅब घेण्यात आले. पण अद्याप झीहुईची चाचणी पॉझिटिव्ह येईल हे निश्चित नाही. इतकेच नाही तर झीहुईची चाचणी देखील झालेली आहे किंवा नाही हे समोर आलेलं नाही. पण जर चाचणी झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार हे मात्र नक्की.

हेही वाचा -Tokyo Olympics: पराभवानंतर भवानी देवीने देशवासियांना म्हटलं, 'मला माफ करा'

हेही वाचा -India tour of England : दोन खेळाडूंना इंग्लंडचे बोलावणे आले; टीम इंडियात बदल

ABOUT THE AUTHOR

...view details